मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज व्यवसायाचा भारताबाहेर विस्तार करणार आहे. देशातील मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पेट्रोकेमिकल्स उद्योगासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. त्यासाठी कंपनी दुबईस्थित कंपनी डीपी वर्ल्डशी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीअंतर्गत मालवाहतूक रस्त्यांवरून रेल्वेकडे हलवली जाईल आणि कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होईल.
लॉजिस्टिक ऑपरेटर डीपी वर्ल्डने सांगितले की, ‘नवीन उपाय रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर प्लांटला अहमदाबादमधील डीपी वर्ल्डच्या इनलँड कंटेनर डेपोशी (ICD) आणि नंतर मुंद्रा पोर्टशी जोडेल. यापूर्वी प्रत्येक कंटेनरला मुंद्रा-जामनगर-मुंद्रा दरम्यान सुमारे 700 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. नवीन सोल्यूशनसह, अंदाजे 700 किमी लांबीचा अहमदाबाद-जामनगर-मुंद्रा मार्गाचे रूपांतर रेल्वे मार्गात करण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ही एकात्मिक रेल्वे सेवा 1260 टन मालवाहतूक करू शकते आणि एकावेळी 45 कंटेनर जोडू शकते. यामुळे एकाधिक ट्रेलर आणि ड्रायव्हर्सची आवश्यकता कमी होऊ शकते. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर बीएसईवर 0.62% वाढीसह 1276.45 रुपयांवर बंद झाला.