पुणे : पुण्यातील एका आयटी अभियंत्याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून स्वतःच्याच तीन वर्षाच्या मुलाला संपवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरल आहे.
हा संतापजनक प्रकार शुक्रवारी( 21 मार्च) नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी उघडकीस आला. हिम्मत माधव टिकेटी (वय 3) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वडील माधव साधुराम टिकेटी याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माधवच्या पत्नीने चंदन नगर पोलिसांना फिर्यादी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील चंदन नगर भागात राहणारा माधव एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. त्याला तीन वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे. मुलीला शाळेतुन घेऊन येतो असे सांगून तो तीन वर्षाचा मुलगा हिम्मत याला घराबाहेर घेऊन बाहेर पडला. दरम्यान विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमधून मुलगी सोसायटीच्या आवारात आली आणि तिथून ती घरी गेली. रात्री उशिरापर्यंत माधव आणि त्याचा मुलगा घरी न आल्याने त्यांनी माधवच्या मोबाईल क्रमावर संपर्क साधला. मात्र मोबाईल क्रमांक बंद येत असल्याने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चंदननगर पोलिसांना पती आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने दिली. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असता माधव खराडी एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. त्याला तिथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे मुलाबाबत विचारणा केली असतात त्याने मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची कबुली दिली. या घटनेने सर्व परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
परिमंडळ चारचे पोलीस उपा युक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे,गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्वाती खेडकर, सहाय्यक निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले,राहुल कोळपे,हवालदा विश्वनाथ गोते यांनी तपास करून त्याला अटक केली.