मुंबई : सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. कारण, यातून चांगला परतावा मिळू शकतो. त्यातच तुम्हीही IPO च्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी फायद्याची असणार आहे. कारण, अशा दोन कंपन्या आहे त्यांचे IPO आता मार्केटमध्ये येणार आहेत.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक ओला इलेक्ट्रिक आणि फार्मास्युटिकल कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्स यांना बाजार नियामक SEBI कडून वित्त उभारण्यासाठी प्रारंभिक किंमत ऑफरिंग (IPO) लाँच करण्याची मंजुरी मिळाली आहे. सेबीच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांच्या आयपीओशी संबंधित मसुदा कागदपत्रांना 10 जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, आता हे IPO आणले जाणार आहेत.
आता या दोन्ही कंपन्या त्यांचे संबंधित IPO लाँच करण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतात. ओला इलेक्ट्रिकच्या प्रस्तावित IPO मध्ये, 5,500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्याव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांकडे असलेले 9.52 कोटी इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ऑफर केले जात आहेत.