पुणे: जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घृणास्पद प्रकार घडला आहे. येथे नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. लैंगिक संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला, यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात आरोपी भावावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घृणास्पद प्रकार घडला आहे. एका तरुणाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणी दौंड तालुक्यातील गिरीम येथील रहिवासी आहे. या तरुणीवर तिच्यावर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे वास्तव्यास असणाऱ्या दोन आरोपींनी अनेक वेळा अत्याचार केला आहे.
या प्रकरणातील धायरी येथे राहणारा आरोपी हा पीडित अल्पवयीन तरुणीचा नात्याने चुलत भाऊ आहे. पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही आरोपींनी पीडितेवर मागच्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केले आहेत.

अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील एका आरोपी नराधमाचा दौंड तालुक्यातील गिरीम परिसरातील वायरलेस फाटा येथे एक फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत आणि पीडितेच्या घरी आरोपींनी वेळोवेळी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. मागील वर्षभरापासून हा अत्याचार सुरू होता. नराधम आरोपी पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही जबरदस्तीने तिच्याशी शरीरिक संबध ठेवत होते. यातून पीडित मुलीला दिवस गेले.
यामुळे पीडितेने एका मुलीला जन्म दिला. हा सर्व प्रकार कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या बहिणीला जीवे मारू अशी आरोपींनी धमकी दिली. या प्रकरणी दौंड पोलीसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना बारामती विशेष न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरक्षक युवराज घोडके करीत आहेत.







