पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासंबंधित एक ऑडिओ प्रसारित झाला होता. यामध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी ४० लाखांची मागणी करण्यात आली होती. यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चाकणमधून दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या एका साथीदाराच्या नागपूरमधून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासंबंधित एक ऑडिओ प्रसारित झाला होता. यामध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी ४० लाखांची मागणी करण्यात आली होती. परीक्षेच्या अगोदर दोन दिवसांपूर्वी एक ऑडिओ समाजमाध्यमात प्रसारित झाल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी तसेच त्यांच्या पालक चिंता करू लागले होते.
या प्रकरणी दीपक दयाराम गायधने (वय २६ वर्षे, चाकण, मूळ. रा. तुमसर जि. भंडारा), सुमित कैलास जाधव (वय २३, चाकण, मुळ रा. नांदगाव, जि.नाशिक) अशी अटक केले आरोपींची नावे आहेत. यांचा एक साथीदार योगेश सुरेंद्र वाघमारे (रा. सोनाली ता. वराठी, जि. भंडारा) याला पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या मदतीने पकडले आहे. या प्रकाराबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अधिक माहिती अशी की, रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाणारी गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पूर्व परीक्षा आहे. या परीक्षेची दोन दिवस अगोदरच प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी तुम्हाला ४० लाख रुपये द्यावे लागतील, अश्या आशयाचा ऑडिओ प्रसारित झाला होता.
याबाबत पुण्यातील एका विद्यार्थ्याच्या मोबाइलवर आरोपींनी संपर्क केला होता. याबरोबरच आयोगाकडेही अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून पुणे पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत असून, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.







