नवी दिल्ली : सध्या सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात सेवांचे दरही वाढले आहेत. वीज बिलांमधील वाढ हेदेखील आर्थिक फटका बसणारे माध्यम बनत आहे. पण, जर तुमचे वीज बिल खूप जास्त असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. कारण, आम्ही तुम्हाला एक खास अशा लाईट्सची माहिती देणार आहोत.

वीज वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात मोशन सेन्सर लाईट्स लावू शकता. या लाईट्समध्ये बेस्ट अशी टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे. ज्यामुळे तुमचे घर ऊर्जा-कार्यक्षम बनविण्यात मदत करतात. या लाईट्स कोणतीही प्रोसेस ओळखतात आणि आपोआप चालू होतात. जेव्हा कोणतीही हालचाल नसते तेव्हा ते आपोआप बंद होतात. हे दिवे चालू किंवा बंद करण्याची गरज नाही. गरज असेल तेव्हाच हे दिवे येतात. मोशन सेन्सर लाईट्समध्ये एक विशिष्ट प्रकारचा सेन्सर असतो जो विशिष्ट श्रेणीतील कोणत्याही प्रकारची हालचाल ओळखतो.
एखादी व्यक्ती, प्राणी किंवा इतर कोणतीही वस्तू सेन्सरच्या रेंजमध्ये येताच, हा सेन्सर सिग्नल पाठवतो जो प्रकाश चालू करतो. व्यक्तीकडून सेन्सरच्या श्रेणीतून गेल्यानंतर काही वेळाने ते आपोआप बंद होते. या लाईट्स प्रकाश देण्याबरोबरच वीज बचतीसाठीही फायद्याच्या मानल्या जातात.








