नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Apple ने एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स आणि टी-मोबाईल यांच्या सहकार्याने आयफोनमध्ये स्टारलिंक सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी जोडली आहे. आता तुम्ही जेथे असाल तेथे तुमच्या iPhone वरून उपग्रहाद्वारे मेसेज पाठवू शकता. भविष्यात तुम्हाला डेटा वापरता येईल आणि कॉल्सही करता येतील.

सेल्युलर कव्हरेज उपलब्ध नसलेल्या भागातही उपग्रह संप्रेषण प्रदान करणे हा या पार्टनरशिपचा उद्देश आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही अशा ठिकाणीही ही सुविधा काम करेल. या आठवड्यात आणलेल्या iOS 18.3 अपडेटमध्ये स्टारलिंक सॅटेलाईट नेटवर्क उपलब्ध करून देणार आहे. या फीचरमुळे यूजर्स सॅटेलाईटच्या मदतीने टेक्स्ट मेसेज पाठवू शकतील.
सध्या आयफोनमध्ये उपलब्ध असलेल्या सॅटेलाईट सेवेमध्ये युजर्संना त्यांचे आयफोन मॅन्युअली सॅटेलाइटशी जोडावे लागतात. पण, स्टारलिंक सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीमध्ये असे होणार नाही. तुमचा iPhone तुमच्या खिशात ठेवला असला तरीही हे तुमच्या आयफोनला उपग्रहाशी आपोआप कनेक्ट होणार आहे.









