मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 18 नोव्हेंबर रोजी मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर आता बाजारात काही प्रमाणात सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, दरांमधील बदल अद्याप सुरू असल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे लागले आहे.

अमेरिकन डॉलर मजबूत होणे, सरकारी रोख्यांवरील परतावा वाढणे आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवू शकते, अशा शक्यतांमुळे सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव निर्माण झाला. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात 18 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सप्टेंबर 2025 नंतरची ही सर्वात खालची पातळी ठरली. या काळात सोन्याचा भाव प्रति औंस 3,726.19 डॉलरच्या आसपास होता. चांदीलाही विक्रीचा फटका बसला.
मात्र, त्यानंतर आलेल्या शहरनिहाय दरांच्या आकडेवारीत काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. 19 नोव्हेंबर 2026 रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे नोंदवण्यात आले आहेत.

प्रमुख शहरांतील आजचे दर
- दिल्ली: 22 कॅरेट सोने 1,25,300 रुपये, 24 कॅरेट 1,36,790 रुपये, चांदी 1,69,460 रुपये प्रति किलो.
- मुंबई: 22 कॅरेट सोने 1,25,120 रुपये, 24 कॅरेट 1,36,590 रुपये, चांदी 1,69,385 रुपये प्रति किलो.
- कोलकाता: 22 कॅरेट सोने 1,24,940 रुपये, 24 कॅरेट 1,36,390 रुपये, चांदी 1,69,485 रुपये प्रति किलो.
- चेन्नई: 22 कॅरेट सोने 1,25,380 रुपये, 24 कॅरेट 1,36,880 रुपये, चांदी 1,69,485 रुपये प्रति किलो.
- बंगळुरू: 22 कॅरेट सोने 1,25,290 रुपये, 24 कॅरेट 1,36,780 रुपये, चांदी 1,69,545 रुपये प्रति किलो.
- हैदराबाद: 22 कॅरेट सोने 1,25,350 रुपये, 24 कॅरेट 1,36,840 रुपये, चांदी 1,69,420 रुपये प्रति किलो.
आगामी काळात अमेरिकेचे आर्थिक धोरण, डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक बाजारातील मागणी यांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक बाजारातील ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे. दागिने घेताना सोन्याची शुद्धता आणि घडणावळ शुल्कही लक्षात घ्यावे.






