पुणे: राज्याच्या विविध भागातील तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये दिवसभर उष्णता अधिक असेल.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोल्हापूरमध्ये कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस असेल तर साताऱ्यात ढगाळ वातावरणासह कमाल तापमान ६ अंश सेल्सिअस असेल. सकाळी हवेत काही प्रमाणात थंडी असेल तर दुपारनंतर उष्णतेचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे. मात्र रात्रीचे तापमान १५ ते १६ अंशा पर्यंत खाली उतरलेले असेल.
पुणे शहरात ‘कसे’ असेल हवामान?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कायम असेल. पुण्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सियसपर्यंत जाईल. तर रात्री मात्र ११ अंशांपर्यंत तापमानात घट होईल. सायंकाळी गारवा जाणवेल. दिवसा मात्र उष्णतेची शक्यता आहे.

सोलापूर सांगलीत काय स्थिती?
आज विभागाच्या अंदाजानुसार, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा सर्वाधिक असेल. आज सोलापुरमध्ये कमाल तापमान ३६ अंश सेल्सियसपर्यंत जाईल. मात्र रात्री १८ ते १९ अंशांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. तसेच सांगलीतही तापमान ३४ अंशांच्या जवळपास असेल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 2 फेब्रवारी पासून पुढे राज्याच्या काही भागमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेत सतर्क राहावे असे हवामान विभागाने सांगितले आहे. येणाऱ्या काळात तापमानात वाढ होईल.







