पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली परिसरात चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असून यात प्रवास करणाऱ्या २ विद्यार्थी मृत्युमुखी पडले आहेत. या बस मध्ये एकूण ३५ विद्यार्थी प्रवास करत होते, यापैकी ६ विद्यार्थी या अपघातात जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी लोणावळ्यातील एका जल क्रीडा केंद्रात (वॉटर पार्क) सहलीसाठी रविवारी (ता. ११) रात्री लक्झरी बस क्रमांक एमएच ०४ जीपी २२०४ निघाले होते. ही बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने जात होती. या बसमधून चेंबूर येथील मयांक कोचिंग क्लासेसचे दहावीच्या वर्गातील एकूण ३५ विद्यार्थी प्रवास करत होते. कोचिंग क्लासचे दोन शिक्षकही बसमध्ये होती.
ही बस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चेंबूरच्या दिशेने जात होती. यावेळी घाट उतरत असताना रात्री आठच्या सुमारास मॅजिक पॉईंटजवळ ही बस डाव्या बाजूला उलटली. या अपघातात विद्यार्थी २०-२५ जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.