Pune News : पुणे : ड्रग्स तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातून फरार झाल्यानंतर ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने एक चौकशी समिती स्थापन केली असून, समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आहेत. ही समिती ससूनमध्ये दाखल झाली असून, अधिष्ठाता संजीव ठाकूरसह सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. समितीने ससून रुग्णालयातील ८० जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवले आहेत.
प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे
या समितीमध्ये डॉ. म्हैसकर यांच्यासह डॉ. सुधीर देशमुख, डॉ. हेमंत गोडबोले आणि डॉ. एकनाथ पवार आहेत. ही समिती ससूनमध्ये दाखल झाली आहे.(Pune News) समितीकडून अधिष्ठाता संजीव ठाकूरसह सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. समितीने ससून रुग्णालयातील ८० जणांचे जबाब नोंदवले आहेत. कैदी रुग्णांना दाखल करुन घेतल्याची कारणे, त्यांच्यावर सुरु असलेले उपचार, होत असलेले निदान याची कसून चौकशी केली जात आहे. या आठवड्यात पुन्हा समिती ससून रुग्णालयात जाणार आहे.
पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. तसेच तपास अधिकारी बदलला आहे. यामुळे एकाच वेळी सर्वच पातळीवर कारवाई सुरु झाली आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे तपास करणार आहेत. (Pune News) यापूर्वी हा तपास गुन्हे शाखेचे सुनील थोपटे यांच्याकडे होता. परंतु सुनील तांबे यांचा गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हे प्रकरण देण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आहे.
नाशिकमध्ये भूषण पाटील याचे सहकारी असलेले शिवाजी शिंदे आणि रोहितकुमार चौधरी या दोघांना अटक केली आहे. भूषण पाटील याचे मित्र आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. (Pune News) पुणे पोलिसांचे एक पथक सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील पुणे पोलिसांना मिळाला आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. ललित पाटील याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत.