Pune News : पुणे : शहर आणि परिसरात फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. खोटी माहिती देवून फसवणूक करण्याचे गुन्हे ठिकठिकाणी दाखल होत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी स्पेअरपार्टची दुकाने असल्याचे सांगून पुण्यातील कंपनीकडून ३५ लाखांचा माल खरेदी केला. मात्र, खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक येथील दोघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत कंपनीच्या वडकी येथील गोडावूनमध्ये घडला.
नाशिकमधील दोघांवर गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रविण बजाज व अतुल लांजेवार (दोघे रा. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune News ) याबाबत सोमाणी पियोजीओ स्पेअरपार्ट एजन्सी कंपनीचे कर्मचारी संदीप भिमराव घुले (वय-३६, रा. मांजरी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नाशिक, भुसावळ, तळोदा, मनमाड या ठिकाणी वेगवेगळ्या नावाची स्पेअरपार्टसची दुकाने असल्याचे सांगितले. दुकानांच्या नावाने फिर्यादी यांच्या कंपनीला मालाची ऑर्डर देऊन माल ताब्यात घेतला. (Pune News ) मात्र, मालाचे पैसे न देता आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या कंपनीची ३४ लाख ६५ हजार २८९ रुपयांची फसवणूक केली. तसेच विश्वासाने दिलेल्या मालाचा अपहार केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ऐन सणांत वीजदरवाढ, प्रति युनिट ‘इतके’ पैसे द्यावे लागणार..
Pune News : ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणी चौकशी समितीची स्थापना; ८० जणांच्या जबाबांची नोंद