पुणे Pune Crime : कंपनीचे शेअर्स कमी किंमतीत खरेदी करून देण्याचे आमिष दाखवत बँक मॅनेजरनेच एका आयटी कर्मचार्याला 27 लाख 46 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime) ही घटना मे 2021 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली आहे. (Pune Crime)
कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी चेतन बळीराम इतापे (वय 36,रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मॅनेजर अशोक सूर्यकांत कदम याच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा एका खासगी बँकेत मॅनेजर समान असलेल्या पोस्टवर काम करत होता. फिर्यादींची त्याच्यासोबत ओळख झाल्यानंतर त्याने त्यांना शेअर्स कमी किंमतीत खरेदी करून देतो, असे आमिष दाखविले.
त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याने वेळोवेळी गुगल, फोन पेद्वारे तसेच एनईएफटी द्वारे 27 लाख 46 हजार 574 रुपये स्वतःच्या खात्यावर घेतले. त्यानंतर बँकेच्या पोर्ट फोलीओमध्ये बनावट एन्ट्री करून ती खरी आहे असे सांगून व भासवून फिर्यादींचा विश्वासघात करत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादीने कोरेगाव पार्क पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.