(Pune Crime) पुणे : पुणे पोलिसांच्या मोक्का कारवाईचा धडाका सुरूच असून, भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजविणाऱ्या ११ जणांच्या टोळीवर मोक्का कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ही १८ वी कारवाई ठरली आहे.
टोळीप्रमुख साकिब मेहबुब चौधरी उर्फ लतिफ बागवान (वय २३, रा. कात्रज) तसेच रेहान सिमा शेख उर्फ दिनेश शेख (वय १९), अब्दुलअली जमालउद्दीन सैय्यद (वय (वय १९), संकेत किशोर चव्हाण (वय १८), ऋतिक चंद्रकांत काची (वय २१) यांच्यासह ११ जणांवर कारवाई केली आहे.
६ जण फरार…!
यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. चौघांना अटक केली असून, ६ जण फरार आहेत. टोळीप्रमुख साकिब चौधरी याने साथीदारांसोबत गुन्हेकरून परिसरात दहशत माजवली. त्यांनी एका रिक्षा प्रवासी तरुणावर जीवे घेणा हल्ला केला होता. तपासात टोळीची गुन्हेगारीकृत्ये सुरूच असल्याचे समोर आले.
तर, साकिब हा वेगवेगळ्या साथीदारांना घेऊन गुन्हे करत असल्याचेही तपासात समोर आले. त्यामुळे टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांनी परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्थना पाटील यांच्यामार्फत पाठविला होता. पोलीस आयुक्तांनी टोळीवर मोक्का कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
World Cup 2023 : वनडे विश्वचषकाच्या तारखा जाहीर या; दिवसापासून सुरु होणार स्पर्धा..!
Indapur Crime : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या ; वालचंदनगर पोलिसांची कामगिरी..!