पुणे : कोरेगाव पार्क मधील ओशो आश्रमाच्या गेटवर बेकायदा जमाव करत आश्रमाच्या गेटमधून प्रवेश केल्या प्रकरणी कोरेगाव पार्क (Pune) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाच्या विरूध्द दुसरा स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….!
ओशो आश्रमाचे धनेशकुमार रामकुमार जोशी उर्फ स्वामी ध्यानेश भारती (65, रा. बंगला नं. 17, ओशो आश्रम ग नं. 1, कोरेगाव पार्क, पुणे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार प्रसुनिल मिरपुरी उर्फ स्वामी चैतन्य किर्ती, मोद त्रिपाठी उर्फ प्रेम पारस, गोपाल दत्त भारती उर्फ स्वामी गोपाल भारती, राजेध वाधवा उर्फ स्वामी ध्यान अनुग्रह, किशोर लाभशंकर रावल उर्फ स्वामी प्रेम अनादी, जगदीश शर्मा उर्फ स्वामी अमन विस्मय, आरी राजदान उर्फ कुनिका भट्टी, न्यु इंडिया न्युजचा प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांच्यासह इतर 100 ते 120 अनुयायांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिस नाईक गोकुळ कन्हैयालाल परदेशी (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरूण विनीत रावल (27, रा. भिलाई वेस्ट, दुर्ग, छत्तीसगड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
ओशो आश्रमाचे व्यवस्थापन आणि अनुयायांच्यात वाद सुरू आहेत. आश्रमाची जागेची विक्री करण्यात येणार आहे. असा काही अनुयायांचा आरोप आहे. त्यातून व्यवस्थापन आणि काही अनुयायांच्यात वाद सुरु आहे.
ओशो आश्रमाच्या गेटसमोर मोठया प्रमाणावर अनुयायी जमले होते. त्यावेळी त्यांनी मोठ-मोठयाने घोषणाबाजी केली तसेच बेकायदा आश्रमात एन्ट्री करण्याचा प्रयत्न केला. ट्रस्टच्या सदस्य साधना (80) यांना धक्काबुक्की झाली तर न्यू इंडिया न्यूजचे प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांनी पत्रकार असल्याचे सांगत आश्रमात एन्टी करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी अनुयायांनी जोशी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोपी करण्यात आला आहे.
वरूण विनती रावलने घोषणाबाजी करत धनेशकुमार जोशी यांच्याशी वाद घोतला. त्यावेळी पोलिसांनी त्यास समजावुन सांगितले. त्यानंतर देखील रावलने वाद घालून पोलिसांना धक्काबुक्की केली. प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Nagar Crime : बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या दोघांना कोतवाली पोलीसांनी ठोकल्या बेड्या!