Pimpri Crime पिंपरी-चिंचवड : क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी तरुणावर प्राणघात हल्ला केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागातून समोर आली आहे. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला मार लागला असून तो गंभीर जखमी झाला आहे.
हर्षल प्रवीण अहिरे (वय २०) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. नीरजसिंग सिकरवार आणि अभिनव असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून दोघांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी हर्षला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार..!
हर्षल हा मित्रांबरोबर हिंजवडी येथील एका मैदानवर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. दरम्यान, खेळता खेळता हर्षलसोबत इतर मित्रांसोबत वाद झाला. पुढे वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी दोन तरुणांनी हर्षल यास मैदानावर बॅटने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत हर्षलच्या डोक्याला गंभीर मार लागला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri Crime : घराचे कुलूप न तोडता चोरी ; दीड लाखांचे दागिने लंपास, असा लागला तपास..!
Pimpri Crime : पोलीस दलात खळबळ ! निगडीत पोलीस स्टेशनच्या बाथरूममध्ये महिलेची आत्महत्या