Nashik Crime नाशिक : आरोग्य खात्यातील महिला अधिकाऱ्यास 10 हजाराची लाच घेताना अॅन्टी करप्शनने रंगेहात पकडले. त्यानंतर या लाचखोर महिला अधिकाऱ्यास अटक करण्यात आली. शहरातील रुग्णालयातील हिवताप विभागातील ही महिला अधिकारी असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या बॅंक लॉकरची तपासणी केले असता मोठे घबाड सापडले आहे. (The lady district Maleria officer of Nashik caught red-handed while taking bribe)
वैशाली दगडू पाटील असे जिल्हा हिवताप महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. आजारी असलेल्या रजेच्या कालावधीतील मासिक वेतन काढून देण्याकरिता त्यांच्याकडे 10 हजारांची लाच पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे मागितली होती तेव्हा त्या एसीबीच्या जाळ्यात अडकल्या.(Nashik Crime)
बॅंक लॉकरमध्ये सापडले ८१ तोळे सोने
दरम्यान, चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटील यांच्या बॅंक लॉकरची तपासणी केली तेव्हा तब्बल 81 तोळे सोन्याचे दागदागिन्यांचे घबाड हाती पथकाच्या हाती लागले. (Nashik Crime) या घटनेनंतर आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅन्टी करप्शनने दोन दिवसांपुर्वी मोठी कारवाई शहरात मोठी कारवाई केली. त्यामध्ये हिवताप विभागात कार्यरत कर्मचाऱ्याकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप अधिकारी संशयित वैशाली पाटील यांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. (Nashik Crime) पाटील यांच्या घराची व बँक लॉकरच्या झाडाझडतीचे आदेश अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिले असता एकूण 81 तोळे सोन्याचे दागदागिन्यांचे घबाड हाती लागल्याने पथकही चक्रावून गेले.
रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या अखत्यारित कार्यान्वित हिवताप विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकारी म्हणून वैशाली पाटील या नोकरी करत होत्या.(Nashik Crime) त्यांनी तक्रारदार हे आजारी असलेल्या रजेच्या कालावधीतील मासिक वेतन काढून देण्याकरिता त्यांच्याकडे 10 हजारांची लाच सोमवारी मागितली. बुधवारी संशयित आरोग्यसेवक संजय रामू राव, कैलास गंगाधर शिंदे यांच्या मदतीने लाचेची रक्कम स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांच्या पथकातील हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, प्रकाश डोंगरे यांनी शिताफीने सापळा रचला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nashik Crime | नाशिक हादरले ! भाजप नेत्यावर गोळीबार; हप्ता वसुलीच्या वर्चस्वातून हल्ला…
Nashik Crime | हृदयद्रावक..! नाशिकमध्ये उकळत्या तेलात भाजून सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत..!