Nagar News : कोतवाली, (नगर) : देवीच्या मंदिरात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने व पैशांची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी केडगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सातमहिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन महिलांवर चोरीचा प्रयत्न केल्याचा व एका महिलेवर चोरी केल्याचा आणि पाच महिलांवर संशयास्पद चोरीच्या उद्देशाने फिरण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कोतवाली पोलिसांची कारवाई
अमृता भिमराज काळे (वय – २२), सुरज श्रीखंड चव्हाण (वय २०), रा. दोघेही समता नगर), प्रतीक्षा प्रदीप काळे (वय २२), रिना बाळु भोसले (रा. दोघीही अंबिका कॉलनी, केडगाव), सुनिता चैतराम सोळंखी (वय ३०, रा. शिवाजीनगर, कल्याणरोड), कविता अंकल भोसले (वय ३०), शिवकन्या विशाल भोसले (वय १९ रा. दोघीही भानसहिवरे ता. नेवासा) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगाव देवी मंदिर परिसरात सीसीटीव्ही तसेच संमातर पेट्रोलिंगसाठी कोतवाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Nagar News) मंदिर परिसरात कोतवाली पोलीस पेट्रोलिंग करत असताना काही महिला संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्या. चोरी करणाऱ्या आणि चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या २ टोळ्यातील सात महिलांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गणेश इंगळे, पोलीस जवान योगेश भिंगारदिवे, अभय कदम, अमोल गाडे, गणेश धोत्रे, संदीप थोरात, विश्वास गजरे, रवी टकले, सत्यम शिंदे, प्रमोद लाहरे, तानाजी पवार, सोनाली भागवत, (Nagar News) स्वाती तोरडमल, पूजा दिक्कत, सविता शेंडगे, गृहरक्षक दलाचे निलेश गजरे, प्रतीक ठोंबरे, सुषमा मोरे, शितल रोकडे यांनी कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar News : Nagar News : कोतवाली पोलिसांकडून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या २२५ वाहचालकांवर कारवाई