Lonavala News : लोणावळा : लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या तीन तरुणांपैकी दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलीस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. स्कुबा डायव्हिंगच्या साह्याने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गला यश आले.
पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विवेक छत्री आणि करण कुंवर अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. एका मित्रासह विवेक आणि करण हे रविवारी लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते. (Lonavala News) लोणावळा तलावामध्ये तिघेही पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. दोन्ही तरुण मूळचे नेपाळ येथील आहेत.
या घटनेची माहिती तिसऱ्या मित्राने पोलिसांना दिली. पोलीस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. (Lonavala News) स्कुबा डायव्हिंगच्या साह्याने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गला यश आले. या घटनेनंतर, तलावाची माहिती असेल तरच पाण्यात उतरावे असे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.
मृतदेहाचा शोध घेणाऱ्या शिवदुर्ग पथकामध्ये अजय शेलार, महेश मसने, सागर कुंभार, मनोहर ढाकोल, राजेंद्र कडू, प्रणय अंबुरे, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, अमोल परचंड, अनिकेत आंबेकर, अमोल सुतार, दक्ष काटकर, आयुष वर्तक, दुर्वेश साठे, महादेव भवर, रतन सिंह, अशोक उंबरे, सुनील गायकवाड़, ब्रिजेश ठाकुर, मयुर दळवी, साहिल भिकोले, निहाल दळवी, आकाश घरदाळे, कैलास दाभणे, दिंपाशू तिवारी,वैभव दुर्गे या सदस्यांचा समावेश आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonavala News : मी आत्महत्या करणार.. म्हणत, रेस्क्यू टीमलाही न जुमानता त्याने संपवले जीवन