विनायक साबळे
Koregaon Bhima | कोरेगाव भीमा : शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुणे महानगर मार्ग तसेच अंतर्गत रस्ते, गाव, रहदारी आदी ठिकाणी ज्या काही अनधिकृत होर्डिंग्स लावण्यात आलेल्या आहेत त्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन व एसपी ऑफिस पुणे यांच्याकडे संघटनमंत्री पुणे जिल्हा भानुदास सरडे यांनी पत्रकाद्वारे करण्यात आल्याची माहिती ग्राहक पंचायतीने दिली आहे.
पोलीस स्टेशन, सदर ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी व पी एम आर डी यांची रीतसर परवानगी घेतली नसेल तर असा होर्डिंग्ज वर कारवाई करण्यात यावी कारण बऱ्याच ठिकाणी होर्डिंग पडून विनाकारण जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण पाहत असतो.
तसेच त्यामुळे विद्रुपीकरण देखील होत असल्याने अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा कार्यकरिणी सदस्य देवेंद्र जगताप , सचिव संतोष शिर्के, अशोक दरेकर, संघटनमंत्री शिरूर तालुका पर्वतराज नाबगे, अशोक मोरे, पंकज बांगर, सतीष जगताप, विशाल गव्हाणे, रामदास दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health Tips | लहान मुलांना दुधासोबत ‘हे’ पदार्थ खायला देणे टाळावे