Khed News : खेड, (पुणे) : चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्यात उडी मारून एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. ०४) हि घटना घडली आहे. Khed News
सोनाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय २४, रा. खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत मुलीचे वडील ज्ञानेश्वर बाळू गायकवाड यांनी खेड पोलिसांना फिर्याद दिली आहे. Khed News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली गायकवाड ही शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात कार्यक्रम असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात येत होता. मात्र नंतर काळेवाडी रस्त्यालगत असलेल्या चासकमान कालव्याच्या मागील बाजूस वाहत्या पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृत तरुणी चासकमान परिसरात राहणारी तरुणी असून तिच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.