Hadapsar News : हडपसर, (पुणे) : जुन्या भांडणाच्या रागातून लोखंडी धारदार हत्याराचा धाक दाखवुन दोघांना शिवीगाळ व हाताने मारहाण करून परिसरातील २२ वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी ८ ते १० जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हि घटना बुधवारी (ता. २५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
८ ते १० जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी रोहीत भारत गायकवाड (वय-२४ रा. सर्वे नंबर – १०६, गोसावी वस्ती हनुमान मंदीराचे शेजारी वैद्यवाडी हडपसर ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यश जावळे, युवराज बदे, सुरज पंडीत, समीर शेख, अक्षय राउत व इतर ३ ते ४ अनोळखी इसम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी यश जावळे, सुरज पंडीत, समीर अक्षय राउत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी यांची या अगोदर भांडणे झाली होती. गोसावी वस्ती हनुमान मंदीराचे शेजारी वैद्यवाडी परिसरात आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी व व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ व हाताने मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच यावेळी आरोपींनी जबरदस्तीने ३० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व रोख रक्कम लोखंडी धारदार हत्याराचा धाक दाखवुन जबरदस्तीने घेवुन निघाले होते.
दरम्यान, यावेळी आरोपींनी लोखंडी हत्यार हवेत फिरवुन दहशत निर्माण केली व एकुण २२ वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी रोहित गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ८ ते १० जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दोरकर करीत आहेत.