हडपसर, (पुणे) : हडपसर परिसरातील वडकीनाला परिसरात एका गादी कारखान्याला आग लागल्याची घटना घडली असून यामध्ये कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
हि घटना शनिवारी (ता. १४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेची वर्दी मिळताच घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए, कोंढवा, हडपसर, काळेपडळ या अग्निशमन दलाकडून एकुण ७ वाहने दाखल झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील वडकीनाला परिसरात १२ गुंठ्याच्या जागेत गादी कारखाना आहे. यामध्ये ४ गुंठे जागेतील सामान हे जळून खाक झाले आहे. या वर्दीची माहिती मिळताच ड्युटीवर नसताना कात्रज अग्निशमन केंद्र येथील जवान तेजस मांडवकर यांनी आग विझवण्यासाठी मदत केली.
दरम्यान, पाण्याचा मारा करत जवानांनी पाऊण तासात आग पुर्णपणे विझवली. हि कामगिरी अग्निशम जवान प्रकाश शेलार, बाबा चव्हाण, शौकत शेख, दत्तात्रय चौधरी, चालक समीर तडवी व गायकवाड यांनी केली.