Pune News : पुणे: आयएएस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या. (Fake IAS officer of Talegaon Dabhade handcuffed by Pune police…)
डॉ. विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे (वय 54 वर्ष रा प्लाॅट नं.336, रानवारा राे हाऊस तळेगाव दाभाडे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. (Pune News) चतुशृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हा व्यक्ती हजर होता. त्यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने अधिक चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. (Pune News) चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव तायडे यांनी आपले खरे नाव लपवून डॉ. विनय देव असे नाव लावले होते. आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात गोपनीय काम करत असल्याचे तो लोकांना सांगत होता. (Pune News)
प्रकरणी अधिक माहिती अशी की 29 मे रोजी औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटी येथे औंध पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठवीण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. (Pune News) या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून हजर असलेला डाॅ. विनय देव हा व्यक्ती स्वतः आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी पदावर गोपनीय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्याने सांगिितलेल्या माहितीबाबत त्यांचेकडे संस्थेच्या पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली असता त्यांचे आय ए एस पदाबाबत त्यांना संशय वाटला.
त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत विनय देव याचा शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून त्याला ताब्यात घेतले.(Pune News) त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे सांगितले. तसेच आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून लोकांमध्ये वावरत असल्याची ही कबुली त्याने दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.