सागर जगदाळे
Big Breaking : भिगवण : बचत गटाच्या कर्जाचे दिलेले हप्ते बँकेत न भरता, परस्पर त्यांची विल्हेवाट लावून, अजित मल्टिस्टेट बँकेची सुमारे २४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार भिगवण परिसरात उघडकीला आला आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी बँकेचे कर्मचारी गणेश अंकुश जगताप (वय ३५, व्यवसाय- नोकरी, अजित मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लि. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.(Big Breaking) गणेश जगताप यांच्या फिर्यादीवरून बबन हनुमंत माने (वय ४५, रा. भिगवण स्टेशन, ता. इंदापूर, जि. पुणे) व किरण सुनिल गावडे (वय ३८, रा. रुई, ता. इंदापूर, जि. पुणे) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण (ता. इंदापूर) येथे अजित मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी लि. सासवड या बँकेची एक शाखा आहे. या शाखेच्या माध्यमातून भिगवण परिसरातील गरजवंत बचत गटाला सुलभ हप्त्यांवर कर्जवाटप करण्यात आले होते. (Big Breaking) एप्रिल २०२२ पासून आजखेरीस या बचत गटाच्या कर्जाचे हप्ते सर्वांनी भरले आहेत. या बचत गटांचे हप्ते जमा करण्याचे काम बबन माने व किरण गावडे यांच्याकडे दिले होते. बचत गटाच्या कर्ज रकमेचे हप्ते कर्जदारांनी जमा केलेले असतानाही या दोघांनी हे हप्ते संगनमताने संस्थेच्या खात्यावर न भरता, हप्ते भरल्याचे बोगस पुस्तकाद्वारे दाखवून, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रक्कम वापरली. दोघांनी मिळून एकूण २४ लाख ३९ हजार ४७९ एवढ्या रकमेचा अपहार करुन, बँकेची फसवणूक केली.
या घटनेबाबत अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : आता आमदारांचे फेसबुक अकाउंट क्लोन; सायबर भामट्यांची करामत
BIG BREAKING NEWS : अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या तब्बल ३५ मुलांना मारहाण