Ambegaon Crime | आंबेगाव, (पुणे) : घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीत उसाच्या शेतात अफुची शेती करणाऱ्या दोघांना घोडेगाव ( Ambegaon ) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शेतातून २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ८ दिवसात पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे.
याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिल महादेव चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. श्रीसंत असे आरोपीचे नाव असून त्याच्या शेतातून १ लाख ८७ हजार पाचशे रुपयांची अफूची झाडे शेतामध्ये आढळून आले.
८ दिवसात पोलिसांची दुसरी कारवाई…
अफुची शेती करण्यासाठी लागणारे, सर्व साहित्य, बी-बियाणे सुद्धा पोलिसांना यावेळी तपासात सापडले. तब्बल दोन लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातीलच आंबेगाव तालुक्यातली ही दुसरी कारवाई आहे. घोडेगाव पोलीस स्टेशन च्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने ही कार्यवाही करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Baramati Crime : हातपाय बांधलेल्या अवस्थेत ५० वर्षीय व्यक्तीचा विहरीत आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ