पुणे– कुल्लू जिल्ह्यातील डोभी पॅराग्लायडिंग साइटवर पॅराग्लायडिंग करत असताना झालेल्या अपघातात पुण्यातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. सूरज शाह असे मृत पर्यटकाचे नाव आहे.
शनिवारी (ता. २४) संध्याकाळी उळी खोऱ्यातील देवगड ग्रामपंचायत हद्दीतील भाटगरण येथे हा अपघात झाला. या अपघातात पॅराग्लायडरचा पायलटही जखमी झाला आहे. त्याच्यावर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील सिरवळ खंडाळा येथे राहणारा सूरज शाह पॅराग्लायडिंगसाठी कुल्लूला गेला होता. पॅराग्लायडरने हवेत उड्डाण केले, त्याच वेळी पॅराग्लायडरचा पट्टा निसटला.
त्यामुळे पर्यटक खाली पडले. अपघातानंतर स्थानिक लोकांनी पर्यटक आणि पायलटला गंभीर अवस्थेत कुल्लू रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी सूरज शाहला मृत घोषित केले. तर पायलटवर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच कुल्लू पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पर्यटकाचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरुदेव शर्मा यांनी दिली.
रविवारी या पर्यटकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पर्यटकाच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले आहे. कुल्लू पोलिसांनी या अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात जो कोणी दोषी आढळला, त्याच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल.