Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘फायर नाईट कॅम्प’मध्ये केली धमाल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 25 December 2022, 14:46

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘फायर नाईट कॅम्प’ मध्ये शनिवारी (ता.२४) खूप मोठी धमाल केली आहे.

 

रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने ‘फायर नाईट कॅम्प’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता ६ वी ते दहावी पर्यंतच्या सुमारे ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या कॅम्पमध्ये मुलामुलींसाठी भाकरी बनविण्याची अनोखी स्पर्धा ठेवण्यात आली होती. आपल्या आईने आपल्यासाठी अतिशय कष्टाने आणि मायेने तयार केलेल्या भाकरीचे महत्त्व मुलांना कळावे आणि त्यांनी फास्ट फूड न खाता भाजी भाकरी या पौष्टिक न्याहारीला पसंती द्यावी हा या उपक्रमामागील हेतू आहे.

या भाकरी स्पर्धेमध्ये इयत्ता नुसार विजेते ठरलेल्या स्पर्धकांना शाळेच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. यावेळी ज्वारीची ताटवे, हरभरा आणि स्वीटकॉर्नचे कणीस या विविध वाणांचा मनमुराद आनंद देणारी ‘हुरडा पार्टी’ ही भरविण्यात आली होती.

भाकरीसाठी बनवलेल्या चुलीच्या निखार्‍यावर भाजलेल्या या गावरान वाणांची मेजवानी अनुभवताना मुले अतिशय उत्साही होती. या वेळी स्कूलच्या वतीने वेगवेगळ्या वाणांमधून मिळणारी जीवनसत्त्व याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. व कडधान्यांचे नियमित सेवन करण्यास सांगण्यात आले.

रात्रीच्या वेळी निरभ्र आकाश न्याहाळत असताना विद्यार्थ्यांना स्कूलच्या वतीने अवकाश निरीक्षणाविषयी माहिती देण्यात आली. जागतिक व भारतीय अवकाश संशोधकांची व संशोधन मोहिमांची महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रात्रीच्या शिरशिरणाऱ्या थंडीत उबदार शेकोटी भोवती रिंगण करून खेळलेल्या म्युझिक बॉल सारखे खेळ आणि अतिशय जोषात झालेल्या गाण्यांच्या भेंड्यानी रात्रीच्या अंधारातही बालचमुंचा उत्साह नजरेत भरत होता. रात्रीच्या रुचकर जेवणाची मेजवानी स्कूलच्या वतीने देण्यात आली. जेवणानंतर बनविलेल्या मसाला दुधाने आणखीच रंगत वाढली.

दुसर्‍या दिवशी रविवारची (ता.२५ सुरुवातच मुळात पहाटे ६ वाजता योगा व ध्यानधारणा शिबिराने झाली. त्यानंतर मुलांनी शिक्षकांसमवेत रामदरा या पर्यटन स्थळी ट्रेकिंग करण्याचा आनंद घेतला. अतिशय उत्साहात आणि आल्हाददायक वातावरणात ‘नाईट फायर कॅम्प’ हे शिबीर पार पडले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रेनबो इंटरनॅशनल स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

दरम्यान, शाळा आणि घर या मध्ये दिवसभर व्यस्त असलेल्या मुलामुलींना शालेय शिस्त आणि घरातील मोकळेपणा यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि शाळेविषयी आपुलकी निर्माण होण्याविषयी अशा उपक्रमांची गरज असल्याचे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. त्यामुळे रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या या उपक्रमाचे पालकांमधून कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37

भोंदू ऋषिकेश वैद्यचं कोठडीतही “भक्ती”चं नाटक! पूजेच्या साहित्यासाठी न्यायालयात धाव; पण पोलिसांनी अन् कोर्टाने दाखवला इंगा

Tuesday, 31 March 2026, 22:59

अहिल्यानगर हादरलं! पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ; साठवण तलावात तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, शोधकार्य सुरू

Tuesday, 31 March 2026, 22:14
Next Post

मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय शाळकरी मुलाची आत्महत्या ; पिंपरी चिंचवड मधील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.