पुणे : भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने एकाची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. २७ सप्टेंबर २०२१ ते १८ जानेवारी २०२२ या कालावधीत कोरेगाव पार्क येथे ही घटना घडली आहे.
दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
गौतम शिवाजी मोरे (वय-३९, रा. कल्याण पश्चिम, ठाणे) असे फसवणूक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वसंत पांडुरंग साबळे (वय- ६४, रा. दिघी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या आरोग्य भारती मेडिकल स्टोअर्सची फ्रेंचायसी देण्यासाठी फिर्यादीकडून १० लाख रुपये घेतले.
दरम्यान, आरोग्यव्रत मेडिकेअर प्रा. लि. या कंपनीत २० टक्के भागीदारीसाठी ३० लाख रुपये घेतले. त्यानंतर व्यवसायाच्या खोट्या जाहिराती बनवून आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :-