ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील तळेगाव- न्हावरा रोड वर शनिवार (दि. ६) जुलै रोजी सकाळी सात वाजता एम एच ४२ बी एफ ५२४७ आईसर टेम्पो शिक्रापूर कडे जात असताना विरुद्ध साईडने आलेल्या एम एच ४२ बी एफ ०१३५ या मारुती सुझुकी कॅरी टेम्पो चालकाला डुलकी लागल्याने आईसर टेम्पोला मध्यभागी धडक दिल्याने पारोडी येथील येळे वस्ती समोर हा अपघात घडला असून या घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विकास भाऊसाहेब गाडे व 42 वर्ष यांनी फिर्याद दिली आहे.
आईसर टेम्पो हा नेचर डेअरी कळस ता. इंदापुर जि. पुणे येथुन शिक्रापुर ता. शिरूर जि पुणे येथील डेअरी येथे पशुखादय देण्यासाठी जात असताना तळेगाव ढमढेरे – न्हावरे रोडवरती तळेगाव साईट कडून येणाऱ्या भरधाव मारुती सुझुकी कंपनीचा कॅरी टेम्पो एम एच 42 बी.एफ. 0135 या टेम्पो चालकाला डुलकी लागल्याने कॅरी टेम्पो हा आईसर टेम्पोच्या दोन्ही चाकाच्या मध्य भागावर धडकल्याने दोन्ही वाहनांचा वेग खूप असल्याने कॅरी टेम्पोचे तोंड पुन्हा विरुद्ध साईटला झाले.
कॅरी चालक रत्नदिप दिगंबर टकले रा. गुरव पिंपरी ता. कर्जत जि. अहमदनगर यास डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने वेळेचे गांभीर्य लक्षात घेता, येळे कुटुंबीयांनी चालकास गाडीच्या बाहेर काढून शिक्रापूर येथील सूर्य हॉस्पिटल येथे उपचारास पाठवले. परंतु काही वेळाने डॉक्टरांना चालकाची प्रकृती चिंताजनक वाटल्याने डॉक्टरांनी पुढे नेण्यास सांगितले. रत्नदिप दिगंबर टकले रा. गुरव पिंपरी ता. कर्जत जि. अहमदनगर यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे.