नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया साईट, ॲप्सचा वापर केला जात आहे. त्यात इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स आणि व्हॉट्सॲपसारख्या अॅपचा समावेश आहे. त्यात व्हॉट्सॲप युजर्सची संख्याही जास्त आहे. असे असताना कंपनीने एक भन्नाट फिचर आणलं आहे. या फिचरच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांची उत्तरं काही क्षणांत मिळू शकणार आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात AI असे याचं नाव आहे. तुम्ही Meta AI वरून कोणत्याही पोस्टबद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकता. तुम्ही meta.ai ला भेट देऊन देखील वापरू शकता. Meta AI सध्या फक्त इंग्रजीला सपोर्ट करत आहे. तुम्ही ChatGPT प्रमाणे Meta AI वापरू शकता. तुम्ही Meta AI ला सर्व प्रकारचे प्रश्न विचारू शकता.
AI फिचर्ससाठी नेमकं करावं काय?
– सर्वप्रथम तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करा.
– यानंतर तुम्हाला ॲपच्या वरच्या बाजूला Meta AI लोगो दिसेल जो गोल असेल.
– त्यावर क्लिक करा आणि वापरा.
– Meta AI सह फोटो तयार करण्यासाठी, तुम्हाला कमांड (प्रॉम्प्ट) आधी Imagine लिहावे लागेल.
– तुम्ही राजकारणाशिवाय कोणत्याही विषयावर Meta AI सह बनवलेले फोटो मिळवू शकता.
– सध्या तुम्ही फोटो आणि ऑडिओद्वारे मेटा एआयला कोणताही प्रश्न विचारू शकत नाही.
– तुम्ही मेटा एआयला गणिताचे प्रश्न देखील विचारू शकता.