Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर भारताने टी20 विश्वचषकावर कोरले नाव; दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 30 June 2024, 8:10

IND vs SA : भारतीय संघाने 11 वर्षानंतर अखेर आयसीसी चषकावर नाव कोरले आहे. भारताचे स्वप्न पूर्ण झाले आहे. . 2007 नंतर भारतीय संघाला टी20 विश्वचषकाने नेह्मीच हुलकावणी दिली आहे. परंतु हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले. अखेरच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी सामना आपल्या बाजूला फिरवला.

 

24 चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला 26 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप यांनी अचूक मारा केला. त्याला जोड मिळाली ती म्हणजे सूर्यकुमार यादवच्या फिल्डिंगची. सूर्यकुमार यादवने गरज असताना डेविड मिलर याचा सीमा रेषेवर अप्रतिम झेल घेतला. टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला.

भारताने 177 धावांच्या आव्हानाचा यशस्वी बचाव केला. बार्बाडोसच्या मैदानात भारताने इतिहास रचला. 2007 नंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषकावर नाव कोरलेय. विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या, बुमराह आणि अर्शदीप यांनी शानदार गोलंदाजी केली. रोहित शर्मा 2007 आणि 2024 विश्वचषक जिंकणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.

अर्शधीप सिंह याने 4 षटकात 20 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराहने आपल्या षटकात फक्त 18 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याने 3 षटकात 20 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट घेतल्या. अक्षर पटेल याला एक विकेट मिळाली.

177 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना भारतीय संघाची छान सुरवात झाली. रीजा हेंड्रीक्स आणि कर्णधार एडन माक्ररम लवकर तंबूत परतले. हेंड्रिक्स 4 आणि माक्ररम चार धावा काढून तंबूत परतले होते. आफ्रिका 12 धावांवर दोन बाद अशी स्थिती होती. पण त्यानंतर स्टब्स आणि डी कॉक यांनी आफ्रिकेच्या डावाला गती दिली. यावेळी या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. अक्षर पटेल याने स्टब्सचा अडथळा दूर करत भारताला मोठे यश मिळवून दिले. पण त्यानंतर क्लासेन यानं डिकॉकच्या साथीने धावसंख्या वाऱ्याच्या वेगानं वाढवली.

क्लासेन आणि डी कॉक यांनी तुफानी फलंदाजी करत सामना फिरवला असे वाटत असताना, अर्शदीप सिंह याने क्विंटनला बाद करत विजयाचा दरवाजा तोडला. त्यानंतर हार्दिक पांड्याने धोकादायक क्लासेन याचा अडथळा दूर केला.

क्लासेन यानं 27 चेंडूमध्ये 52 धावांची वादळी खेळी केली तर क्विंटन डी कॉक याने 31 चेंडूत 39 धावा केल्या. स्टब्स 31 धावा काढून बाद झाला आणि मिलरने 21 धावांचे योगदान दिले. अखेरच्या 24 चेंडूत आफ्रिकेला 26 धावांची गरज होती. हार्दिक पांड्याने भेदक मारा करत केवळ चार दावा दिल्या.

त्यापुढील षटकात जसप्रीत बुमराहने फक्त दोन धावा दिल्या. 19 व्या षटकात अर्शदीप सिंह याने फक्त चार धवा दिल्या आणि तिथेच सामना आपल्या दिशेने फिरला. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने 16 धावांचा यशस्वी बचाव केला आणि भारताने आपलय विजयावर शिक्कामोर्तब केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Know about leh ladakh as tourist destination

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर 'या' ठिकाणांना द्या प्राधान्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.