उरुळी कांचन, (पुणे) : येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचा इयत्ता दहावीचा निकाल सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकाल लागल्याची माहिती मुख्याध्यापक ज्योती भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी (ता. 27) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विद्यालयातील 156 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत.
प्रथम पाच आलेले विद्यार्थी..
प्रथम वैष्णवी हरिशंकर गुप्ता 95 टक्के,
द्वितीय पूनम दत्तात्रय जरे, 92.80 टक्के,
तृतीय वेदांत संदिप थोरात 92.40 टक्के,
चतुर्थ सानिका विकास नाईकनवरे 92.20टक्के,
पाचवा अक्षय दिनेश शेंडगे व वेदांत दादासाहेब शेवते 92 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, 156 विद्यार्थ्यांपैकी 52 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 64 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 38 विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत आणि 02 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या 156 विद्यार्थ्यांनी उज्वाल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच शाळेचे नावलौकिक वाढविले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शाळा समिती अध्यक्ष, सर्व सल्लागार समिती सद्स्य, मुख्याध्यापक ज्योती भोसले यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.