नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने सोमवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर केले. तेथून आता केजरीवाल यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. न्यायालयाने केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने न्यायालयात न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.
अरविंद केजरीवाल यांच्या हजेरीवेळी पत्नी सुनीता, आप नेते सौरभ भारद्वाज, आतिशी, गोपाल राय यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 28 मार्च रोजी न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिला नाही आणि त्यांना 1 एप्रिलपर्यंत ईडी रिमांडवर पाठवले. केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती.
ईडीने न्यायालयीन कोठडी मागितली
न्यायालयाने सांगितले की, ट्रायल कोर्टाच्या आदेशानुसार ते कोठडीत असल्याने त्यांच्यासमोर स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत. याचिकाकर्त्याच्या अधिकारक्षेत्रावर भाष्य केलेले नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ईडीने न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे.
केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत
ईडीचे वकील एएसजी राजू यांनी केजरीवाल तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल प्रश्नांची थेट उत्तरे देत नसल्याचे राजू म्हणाले. हे सर्व न्यायालयाला सांगण्याचा उद्देश हा आहे की, भविष्यात ईडी देखील केजरीवाल यांच्या कोठडीची मागणी करू शकते. केजरीवाल प्रश्नांची थेट उत्तरे देत नसल्याचे राजू म्हणाले.