Pune News : पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर जाळपोळ, मोडतोड, उपोषण, कॅण्डल मार्चच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ मंगळवारी (ता. ३१) जमावाने मोठ्या प्रमाणावर टायर जाळून आंदोलन केले. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
जमावबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई
याप्रकरणी रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले (Pune News ) यांच्यासह ४०० ते ५०० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी या संदर्भात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मंगळवारी (ता. ३१) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाजवळ आंदोलन करण्यात आले. (Pune News ) आंदोलनात ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आंदोलकांनी टायर पेटविल्याने वाहतूक ठप्प झाली. खेड-शिवापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune News ) सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : साखळी उपोषण, बाजारपेठ बंद अन् कँडल मार्च; सणसवाडीत मराठा आंदोलनाची धग कायम
Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच ई-रिक्षा सेवा; प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय