Pune News : पुणे : पुणे शहरातील विविध भागात दिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यास पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून तब्बल १७३ गुन्ह्यांची उकल झाल आहे. तर सुमारे १ कोटी २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी (ता.२८) पत्रकार परिषदेत दिली.
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (२३, रा. मांजरी), बच्चनसिंग जोगींदरसिंग भोंड (२५, वैदवाडी), रामजितसिंग रणजिंतसिंग टाक, कणवरसिंग काळुसिंग टाक, सोन्याचे व्यापारी संतोष शिवाजी पारगे (४५,रा. हडपसर), गोपीनाथ जालिंदर बोराडे (२९), रोहितसिंग सुरेंद्रसिंग जुनी (२२), आरती मंगलसिंग टाक (३२) आणि कविता मन्नुसिंग टाक (३०) यांच्यासह इतर आरोपीं अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune News) या टोळीकडून सव्वाकिलो सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, तीन पिस्तुले, १४ जिवंत काडतुसे आणि चोरीची वाहने असा १ कोटी २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी हा फुरसुंगी गावातील झाडींमध्ये लपला आहे. अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सापळा रचून दुधानी, भोंड यांना ताब्यात घेतले. (Pune News) आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून तीन पिस्तुले, १४ जिवंत काडतुसे, मोबाइल, कटावणी, कोयता असा मुद्देमाल जप्त केला.
त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी साथीदार तिलकसिंग, रामजितसिंग, करणसिंग, अक्षयसिंग तसेच कणवरसिंग यांच्या मदतीने शहर व परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार युनिट पाचच्या पथकाने रामजितसिंग, कणवरसिंग यांना ताब्यात घेतले. (Pune News) चौकशीत आरोपींनी संगनमताने पुणे शहर, पिंपरी आणि जिल्ह्यातील विविध भागात घरफोडी केल्याचे कबूल केले.
दरम्यान, आरोपींकडून पोलिसांनी ८० लाख १५ हजारांचे दागिने, ७८ हजारांची चांदी आणि इतर मुद्देमाल असा तब्बल १ कोटी २२ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. (Pune News) आरोपींनी पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात केलेले तब्बल १७३ गुन्हे उघडकीस आले आहेत
ही कामगिरी पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहीरट, खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे अशोक इंदलकर, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, अजितकुमार पाटील, राजेंद्र पाटोळे, विकास जाधव, शाहीद शेख, अंमलदार संतोष क्षीरसागर, संजय भापकर, सयाजी चव्हाण, किरण ठवरे, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, निखिल जाधव, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्यासह पथकाने केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भागीरथी missing’ चित्रपटाच्या पोस्टर आणि म्युझिक चे दिमाखादार सोहळ्यात लॉंचिंग