Pimpri News : पिंपरी : छोट्या-मोठ्या कारणांवरून झालेल्या वादातून कोयत्याने मारहाण करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. दांडिया खेळताना झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलाला आणि भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या भावाला कोयत्याने मारहाण केली.
पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
याबाबत मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष थोरात (वय २१), आकाश थोरात (वय २२), आदित्य मंगळवेडेकर (वय २१), नितीन शिंगाडे (वय ४०, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे. (Pimpri News) तर, त्यांचा साथीदार क्रिश शिंगाडे (वय २१) हा पसार आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथे घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दांडिया खेळत असताना फिर्यादीला आरोपी संतोष याची दांडिया लागली. त्यामुळे नीट दांडिया खेळ, असे फिर्यादीने सुनावले. याच कारणावरुन त्यांच्यात भांडण झाले. आरोपी आपल्या साथीदारांना घेऊन परत आला. (Pimpri News) आरोपींनी फिर्यादीला खाली पाडले. लाथा-बुक्यांनी मारहाण केली. आरोपी नितीनने डोक्यात स्टीलचा पाइप मारला. फिर्यादीचा मावस भाऊ रोहित जाधव हा भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आल्यानंतर आरोपींनी ‘तू आमच्यामध्ये का येतोस, तुला ठार मारतो’ असे म्हणत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. स्टीलच्या पाइपने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : मनोज जरांगे पाटलांना पाठिंब्यासाठी पिंपरीत साखळी उपोषण
Pimpri News : संक्रमण काळातील योगदान समाजासाठी दिशादर्शक : प्रा. डॉ. सदानंद मोरे