Pune News : पुणे : महिला घरात देखील सुरक्षित नसतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पुतण्याने स्वतःच्या काकूला धमकावून तिच्यावर बलात्कार करुन, पैसे उकळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पर्वती परिसरात उघडकीला आली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने पुतण्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काकूने दिलेल्या फिर्यादीवरून पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यभागातील पर्वती परिसरात तक्रारदार महिला राहतात. शहरात मध्यभागात त्यांचे दुमजली घर आहे. (Pune News) चार वर्षांपूर्वी पुतण्याने काकूला घराच्या पहिल्या मजल्यावर बोलावले. तू माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करते, असे मी काकाला सांगेन, अशी धमकी दिली. (Pune News) त्यानंतर तिच्यावर अमानुष बलात्कार केला. त्यानंतर पुतण्या सातत्याने काकूला धमकावत होता. काकूला धमकी देऊन त्याने वेळोवेळी तिच्याकडून पैसे उकळले.
पुतण्याच्या सतत होणाऱ्या छळाला कंटाळून व धमकीला घाबरून अखेर काकूने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. (Pune News) या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील रिक्षाचालक संघटनेकडून बंदची हाक; ५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी होणार..
Pune News : येत्या दिवाळीत पवार कुटुंब एकत्र येणार का? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या…