School News : महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक खास विमा योजना जाहीर केली असून शाळकरी आणि पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्यासाठी ही योजना लागू असणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या एका पालकाला देखील याचा लाभ घेता येईल, याचा प्रीमियम २० रुपयापासून सुरु होईल ,यामध्ये अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.
अपघाती विमा संरक्षण
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या हि विमा योजना सरकारी किंवा अनुदानित सर्व महाविद्यायालयातील विद्यार्थ्यांना लागू असेल, २० रुपये प्रीमियम भरून एका विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल, ही पॉलिसी एक वर्षांसाठी लागू असेल तर ६२ रुपये प्रीमियम मध्ये याच कालावधीसाठी पाच लाख रुपयांचा कव्हरेज मिळेल. अपघातानंतर उपचारासाठी दोन लाखांचे मेडिकल साठी कव्हरेज ४२२ रुपयांपर्यंत मिळेल.
दरम्यान, प्राथमिक विमा सदस्य हा महाराष्ट्रच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत संलग्न, संबंध, प्रशासित व वर्गीकृत असलेली महाविद्यालये संस्था किंवा विद्यापीठा मध्ये शिकणारा असावा. सेकंडरी विमा सदस्य हा विद्यार्थ्याचा शाळा व महाविद्यालये मधील प्रवेश अर्जावर नोदणी असणारा पालक असेल.
तसेच योजनेसाठी ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी आणि नंशनल कार्पोरेशन कंपनी लिमिटेड या कंपन्आयाची निवड करण्हेयात आली आहे. २० आणि ४२२ रुपये प्रीमियम असणाऱ्या योजना आयसीसीआय च्या असणार आहेत. तर दर रुपये ६२ रुपये प्रीमियम असा पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नंशनल कार्पोरेशन कंपनी लिमिटेड ऑफर करेल, असेही आदेशात म्हटले आहे.
‘या घटनांमध्ये मिळणार नाही कव्हर’
आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, गर्भधारणा किवा बाळांतपण, मोटार रंली किंवा साहसी खेळामध्ये सहभाग, गृह युदधात सहभाग, नक्षल वादि हल्ला वगळता इतर दहशतवादी हल्ले, दारूच्या प्रभावाखाली झालेली दुर्घटना, मादक पदार्थ चे सेवन, विमा लाभार्थी कडून हत्या, नुक्लियर रेडीएषण अशा घटना मध्ये विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही, असेही आदेशात नमूद आहे.