Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले. तर शरद पवार यांना मानणारा एक गट तयार झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके हे नेमके कुणाच्या बाजूने हे अद्याप अस्पष्ट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आता बेनके यांनी पत्रकार परिषद घेत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
माझी भूमिका तटस्थ
बेनके म्हणाले की, शरद पवार हे माझे दैवत आहेत. मात्र, अजित पवार हे देखील आमचे नेते आहेत. यामुळे निर्णय घेणे माझ्यासाठी अवघड आहे. जेव्हा माणसाच्या मनाची घालमेल होते, (Pune News ) तेव्हा शरीराचे ऐकायचे असते. शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही माझ्या मनात आणि शरीरात आहेत, असं अतुल बेनके यांनी म्हटलं आहे.मात्र, माझी भूमिका तटस्थ आहे. विकास कामासाठी मी ज्यांच्याकडे जावे लागेल, त्यांच्याकडे मी जाणार आहे, असंही बेनके म्हणाले आहेत.
राजकारणाची सध्यस्थिती पाहता मी २०२४ ची निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत नाही. मी जुन्नर तालुक्यातील जनतेची कामे करणार आहे. समाजकार्यात मी कार्यरत राहीन, (Pune News ) असे सांगत अतुल बेनके यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले आणि आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
जुन्नर तालुक्याच्या हितासाठी अजित पवार हे पाहिजेत. बुडीत बंधाऱ्याची कामं रखडली आहेत. सरकार बदललं आणि नवीन सरकारने काही बदल केले आहेत. शरद पवार यांच्या बद्दल जितका आदर आहे तितकाच आदर अजित पवार यांच्याबद्दलही आहे. (Pune News ) माझ्या मनात पहिलं स्थान दिलीप वळसे पाटील आणि त्यानंतर अजित पवार यांना आहे. आम्ही पवार कुटुंबासोबत आहोत. त्यामुळे हा निर्णय घेणं अवघड आहे, असं अतुल बेनके म्हणाले आहेत.
लोकांनी आम्हाला विकासकामे करण्यासाठी निवडून दिले आहे. मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कटबद्ध आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहोत, असंही बेनके म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खुशखबर! पुणेकर होणार वाहतूक कोंडीतून मुक्त… २७ हजार कोटींच्या प्रकल्पास मान्यता!