Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC News : काट्या कुट्यात रानमेवा शोधत, शेळ्या चारणारी ‘जोत्स्ना’ची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसनी…!

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 9 July 2023, 18:00

MPSC News शिरूर :  मावळातल्या डोंगर कपारीत आई वडींलासोबत शेळी चारण्यासाठी जायच. या काटेरी वाटेवर ऊन, वारा, पाऊस झेलत त्यांच्या जिवनातील दुख पहायच. कधी कधी हिंस्त्र प्राण्यांना सामोरे जायच. उपासमारीत मोलमजूरी करणाऱ्या बापान शिक्षणासाठी प्रोत्साहन द्याव. ठाकर समाजातील गरीबी परिस्थीतीला सामोरे जात ऊभा केलेला संसाराला काटेरी झुडपांमधून रानमेवा मिळावा. (MPSC News) अशीच परिस्थीती जुन्नर तालुक्यातील बाळोबाची वाडी येथील ठाकर समाजातील जोत्साना बबुशा भालेकर या मुलीची झाली आहे. (MPSC News) समाजातील अन्यायाविरूद्ध असणारी चिड व्यक्त करत तीने जिद्द व चिकाटीने अभ्यास करत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसनी घातल्याने तिच्या आई वडीलांच्या डोळ्यात आनंदाअश्रु तरळले होते. (MPSC News) त्यामुळे जुन्नर तालुक्यातील ठाकर समाजातील जोत्स्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (MPSC News)

बाळोबाची वाडी येथील ठाकर समाजातील ‘जोत्स्ना’चे पहिल्या प्रयत्नात यश  

जुन्नर तालुक्यातील बाळोबाची वाडी हे मावळ भागातील अगदी कमी लोकवस्ती असणारे गाव आहे. ठाकर समाजातील अधिवासी भागात शिक्षणासाठी काटेरी वाटेतून पायपिट करत जोत्स्ना ने गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले आहे. बाळोबाच्या वाडीत राहणाऱ्या ठाकर समाजातील बाबुशा भालेकर यांच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य, दुसऱ्याच्या शेतावर राब, राब राबायचे. दररोज मोलमजुरी करायची अन् आपल्या चिमुकल्यांसह पोटाची खळगी भरायची, प्रत्येक दिवसाची अशी ही सुरुवात होती. डोंगर कपारीत बकऱ्यांच्या पाठीमागे धावत आई तारा तर वडील बबुशा यांच्या सोबतीने आयुष्याच्या काही काटेरी वाटा पाहिल्या आहेत. तिने पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण श्री छत्रपती हायस्कूल येणरे या ठिकाणी शिक्षण घेतले आहे.

या काळात शिक्षणासाठी काही योजना जोत्स्ना पर्यंत पोहचल्या. त्यामुळे तिला शिक्षणासाठी पाठबळ मिळाले. दररोज काटेरी वाटेतून चार ते पाच किलोमिटर धावून तिने शिक्षण घेतले आहे. याकामी मुख्याध्यापक तान्हाजी लांडे यांनी सर्वोतोपरी मदत केली. अकरावी व बारावी पर्यंतचे शिक्षण तिने म्हाळसाकांत कॅालेज आकुर्डी येथे पुर्ण केले. हडपसर येथील आण्णासाहेब मगर कॅालेज मधून तिने कला पदवीतून शिक्षण घेतले आहे.

 

धावण्याच्या क्रिडा प्रकारातून तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने उल्लेखनिय कामगीरी केली होती. या काळानंतर तिने 2018 मध्ये मुंबई लोहमार्ग पोलिस दलात भरती झाली. सरकारी नोकरी मिळाल्याने तीने ध्येय उंचावले होते. तिने या पदा पर्यंत जिद्द न ठेवता. तिला अधिकारी बनण्याचे स्वप्न पुर्ण करायचे होते. यशस्विता मिळण्यासाठी घरच्या घरी अभ्यास सुरूच ठेवला होता. त्यातून तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या यावेगवेगळ्या परिक्षा दिल्या.

दरम्यान, सन 2020 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा परिक्षेचा निकाल जाहिर झाला. त्यात जोत्स्नाला पहिल्या प्रयत्नात यश मिळाले असून पोलिस उपनिरीक्षक पदासाठी तिची निवड झाली आहे. अखेर ठाकर समाजातील या मुलीने आपल्या आई वडीलांची मान अभिमानाने उंचावली आहे.

यशस्वितेचे गमक साधल्यावर जोत्स्ना म्हणाली की, काटेरी वाटेवरील जीवनाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली असून आई वडीलांचे सर्व स्वप्न पुर्ण करणार आहे. या पदातून जनतेची नेहमीच सेवा करून न्याय मिळवून देण्याचे काम करेन. नव्याने स्पर्धा परिक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करताना आपल्या आई वडीलांच्या कष्टाला विसरू नका. जिद्द व चिकाटी ठेवून परीक्षेला सामोरे जा.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Mumbai News : राज्यातील सर्व ग्रामपंचायतीत उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे दोन उपसरपंच असावेत; मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.