Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 3 July 2026, 11:55

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. सध्या पुण्यात अधिकृतपणे पावसाळा सुरू झाला असला, तरी शहराची पाण्याची चिंता वाढली आहे.गेल्या 2 दिवसांपासून शहरात केवळ रिमझिम पाऊस होत असल्याने धरण क्षेत्रात पाण्याची आवक झालेली नाही. परिणामी, पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख 4 धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला असून एकूण उपयुक्त साठा अवघा 13% वर आला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा 56% इतका होता, म्हणजेच एका वर्षात तब्बल 43% ते 47% ची मोठी घट झाली आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, धरणांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:

टेमघर धरण: 0% (पूर्णपणे कोरडे)

 

वरसगाव धरण: 13%

खडकवासला धरण: 15% (रिमझिम पावसामुळे यात फक्त 1 ते 2% वाढ झाली आहे)

पानशेत धरण: 18%

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ‘टेमघर’ धरणाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. यंदा या धरणात शून्य टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या 10 वर्षांचा इतिहास पाहिला तर 2016, 2019, 2022 आणि आता 2026 अशा चार वर्षांत हे धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. अगदी 2025 मध्येही येथे केवळ 37.95% पाणी होते.

सध्याची परिस्थिती 2016 च्या भीषण दुष्काळासारखीच चिंताजनक बनत चालली आहे. त्यावेळी पानशेतमध्ये 8.10% तर पवना धरणात 10.12% साठा शिल्लक होता. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने सर्व नागरिकांना पाणी अत्यंत जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

आगामी काही दिवसांत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला नाही, तर पुणे शहरात लवकरच पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे पुणेकरांवर पाण्याचे संकट ओढवले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.