Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 3 July 2026, 10:26

उरुळी कांचन, (पुणे) : घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची रेलचेल आणि अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला विवाह सोहळा… अशा आनंदाच्या वातावरणात घरातून नववधूसाठी केलेले तब्बल 4 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घरातील कपाटातून अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत 23 जून ते 1 जुलै दरम्यान ही घटना घडली.

याबाबत अक्षय सुरेश कांचन (वय 29, रा. शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यत आला आहे.

फिर्यादी अक्षय कांचन हे शिंदवणे रोडवर ‘अक्षय मेडिकल’ चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 3 जुलै 2026 रोजी लग्न आहे. विवाह सोहळ्यासाठी आणि होणाऱ्या पत्नीसाठी कांचन कुटुंबाने सोन्याचे दागिने घडवले होते. हे सर्व दागिने 23 जूनला अक्षय यांनी आपल्या घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरूममधील लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये सुरक्षित ठेवले होते.

लग्नकार्यामुळे 23 जून ते 1 जुलै दरम्यान घरामध्ये नातेवाईक आणि पाहुण्यांचे सतत येणे-जाणे सुरू होते. याच धामधुमीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने कपाटातील दागिन्यांवर डल्ला मारला.गुरुवारी (ता. 01) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अक्षय यांना लग्नाच्या विधींसाठी सोन्याचे दागिने त्यांच्या आईकडे द्यायचे होते.

 

त्यामुळे ते कपाटातील ड्रॉवर उघडण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. मात्र, ड्रॉवर उघडताच आत ठेवलेले सोन्याचे दागिने गायब होते. अक्षय यांनी तातडीने कुटुंबातील सदस्यांना विचारून संपूर्ण घरामध्ये दागिन्यांची शोधाशोध केली, मात्र दागिने कुठेही मिळून आले नाहीत. पाहुण्यांच्या गर्दीत कोणीतरी अज्ञात इसमाने हे दागिने चोरल्याची खात्री पटल्यानंतर अक्षय यांनीउरुळी कांचन पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये तीन लाख रुपयांचे 58.85 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण, 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 13.88 ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण असा तब्बल 4 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला आहे. अक्षय कांचन यांनी दिलेल्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

घरात बाहेरचा कोणीच नाही... तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp