Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 October 2026, 20:14

लोणीकंद : पुणे-नगर महामार्गावरील लोणीकंद (ता. हवेली) येथील बहुचर्चित ‘गोल्डन मॅन’ सचिन नानासाहेब शिंदे खून प्रकरणात आरोपी मनोज साळवे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी साळवे यांचा खुनाच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच, त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावा नसल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने साळवे यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.

लोणीकंद येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएमसमोर सचिन शिंदे यांच्यावर 9 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.50 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी 12 ते 13 आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये मनोज साळवे यांचाही समावेश होता.

बचाव पक्षाचा ठोस युक्तिवाद

या प्रकरणात मनोज साळवे यांच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग आणि ॲड. सर्वेश निकम यांनी बाजू मांडली. साळवे यांचा सचिन शिंदे यांच्या खुनाशी कोणताही संबंध नसून, पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावा नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. त्यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला. फिर्यादी पक्षाच्या वतीने ॲड. उज्वला पवार यांनी काम पाहिले.

 

दरम्यान, बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांनी मनोज साळवे यांची या खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, या निकालामुळे सचिन शिंदे खून प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, या प्रकरणातील अन्य आरोपींबाबतच्या न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50

कवडीपाटमध्ये भरदिवसा घरफोडी; दोन फ्लॅट फोडून रोख रकमेसह 14 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Saturday, 17 October 2026, 19:41

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एंट्री; तपासानंतर आता खटल्याकडे लक्ष….

Saturday, 17 October 2026, 18:45
Next Post

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp