Indapur News इंदापूर – भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पासून पुणे जिल्ह्यात व इंदापूर तालुक्यात भाजप पक्ष वाढविण्याचे काम करीत आहे. इंदापूरची जागा ही शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपकडे आहे. (Indapur News) व आगामी निवडणुकीत भाजपकडेच राहणार हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. (Indapur News) त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारास उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापुरात येतील, असे प्रत्युत्तर इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी मंगळवारी दिले. (Indapur News)
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा प्रचार करावा लागेल असे वक्तव्य केले. त्यास भाजपचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
अँड.शरद जामदार म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युतीचे गतिमान सरकार एक वर्षापासून बहुमताने कार्यरत आहे. या शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये येऊन अजित पवार हे सहभागी झाले असून, शिवसेना- भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पद व त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिपदे दिली आहेत. त्यामुळे इंदापूरची जागा ही शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपची होती व भाजपकडे राहणार असून, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारास उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार इंदापूरला येतील, असे भाजपचे तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या इंदापूर तालुकाध्यक्षांनी विधाने करण्याअगोदर ते अजित पवार यांचे पक्षाबरोबर आहेत की ज्येष्ठ नेते शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांच्या बरोबर आहेत. हे त्यांनी अगोदर जाहीर करावे, असा सल्लाही अँड. जामदार यांनी तालुकाध्यक्ष कोकाटे यांना दिला.