Sangli News : सांगली : सांगली जिल्ह्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे. 11 महिन्यापुर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
तासगाव तालुक्यातील येळावी येथील घटना
राज संजय जाधव (वय २३) आणि ॠतुजा जाधव (२०) अशी आत्महत्या केलेल्या नवदाम्पत्याची नावे आहेत. तासगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 महिन्यांपूर्वी राज आणि ऋतुजा यांचा विवाह संपन्न झाला होता. बीएससीपर्यंतचे शिक्षण झालेल्या राजचा बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय होता व तो द्राक्षबाग शेती करत होता. (Sangli News ) सध्या ते स्वतःची शेती करत असताना ते नोकरीच्या शोधात होते. पत्नी ॠतुजा म्हणूनच काम करत होत्या. दरम्यान, जाधव कुटुंबियांनी बुधवारी (28 जून) रात्री एकत्रित जेवण केले. त्यानंतर राज आणि ऋतुजा हे दाम्पत्य आपल्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले आणि इतर कुटुंबीय दुसऱ्या खोलीत झोपी गेले. रात्री दीडच्या सुमारास राज यांच्या बेडरुममधून उलट्या होत असलेला आवाज राज यांच्या वडिलांना ऐकू येऊ लागला. त्यामुळे वडिलांनी त्यांच्या बेडरुमकडे धाव घेतली. बेडरुमचा दरवाजा उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना राज आणि ऋतुजा हे कोणतंतरी विषारी औषध प्राशन करुन बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले.
कुटुंबियांनी तातडीने या दोघांनाही खाजगी वाहनातून तासगांवातील डॉ. जाधव हॉस्पिटल इथे उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तासगांव ग्रामीण रुग्णालय इथे नेण्याचा सल्ला दिला. (Sangli News ) त्यामुळे तातडीने या दोघांनाही ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी ते दोघे मृत झाल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sangli News : सव्वा लाख रुपयांची लाच घेताना पालिकेच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले
Sangli News : चकना आणण्यासाठी गेला अन् मोबाईलसह दुचाकीही घेवून झाला पसार