Health News पुणे : आजकालच्या धावपळीच्या जमान्यात घर आणि ऑफिसच्या वेळा सांभाळताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. जेवण बनवण्याचा कालावधी कमी करण्यासाठी महिला सर्रास कुकरची मदत घेतात. यामुळे जेवण लवकर शिजतेच, त्याचबरोबर इंधनाची देखील बचत होते, असा समज असतो. पण हे साफ चुकीचे आहे. तुम्ही सुद्धा असे करत असाल तर ताबडतोब सावध होण्याची गरज आहे. वेळ वाचवण्यासाठी आणि थोडे इंधन वाचवण्याच्या नादात तुम्ही आपल्या आरोग्याशी खेळत आहात, हे लक्षात असूंद्या…Health News
वेळ वाचवण्यासाठी आणि थोडे इंधन वाचवण्याच्या नादात तुम्ही आपल्या आरोग्याशी खेळत आहात
तज्ज्ञांच्या मते, प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवणे आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर असते, त्यापेक्षा जास्त ते नुकसानकारक आहे. काही वस्तू कुकरमध्ये शिजवून खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कोणत्या वस्तू कुकरमध्ये शिजवून खाव्यात आणि कोणत्या नाही, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.(Health News)
या गोष्टी कुकरमध्ये शिजवून खाऊ नयेत
– जर तुम्ही भरपूर स्टार्च असलेले जेवण प्रेशर कुकरमध्ये शिजवत असाल, तर हे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
– तांदूळ कधीही कुकरमध्ये शिजवून खाऊ नये. कारण ते कुकरमध्ये बनवल्यास तांदळात असलेले स्टार्च रसायन बाहेर पडू शकते. ज्यामुळे प्रेशर कुकरमध्ये बनवलेल्या तांदळामुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.
– नूडल्स कधीही कुकरमध्ये शिजवू नयेत. कारण यात भरपूर स्टार्च असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे नूडल्स नेहमी पॅनमध्ये बनवावेत.(Health News)
– बटाटे प्रेशर कुकरमध्ये शिजवून खाऊ नये. कारण प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवल्याने त्याची चव नष्ट होते, तर कुकरमध्ये शिजवलेले बटाटे खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. हे पदार् थकुकरमध्ये शिजवल्याने अॅक्रीलामाइड नावाचे हानिकारक केमिकल तयार होते. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
– अनेकांना मासे खायला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का की प्रेशर कुकरमध्ये मासे शिजवल्याने अनेक आजार होण्याचा धोका असतो.(Health News)
– प्रेशर कुकरमध्ये पास्ता बनवू नये. कारण यात स्टार्च असते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक आहे, तर त्याची चव देखील खराब असू शकते. त्यामुळे पास्ता कढईत शिजवून घ्या.(Health News)