Lonavala News : लोणावळा(पुणे) : केदारनाथ व चारधाम यात्रेचे आमिष दाखवत येथील भांगरवाडी विभागात राहणार्या 37 जणांकडून तब्बल 10 लाख 36 हजार रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 16 फ़ेब्रुवारी ते 19 मे 2023 दरम्यान भांगरवाडी, लोणावळा येथे घडला आहे.
लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
चारधाम यात्रेला नेण्यासाठी म्हणून आधी पैसे जमा केल्यावर नंतर यात्रा रद्द झाली असल्याचे कारण सांगून पैशाचा परतावा म्हणून बनावट चेक देत 37 जणांना गंडा घालणार्या पुण्यातील एका प्रवासी कंपनीचालकावर (Lonavala News) लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीपकुमार दत्तात्रय मोदे (55, रा. लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, ड्रिम कास्टर टूरचे संकेत रामचंद्र भडाळे (रा. धायरी, पुणे) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत रामचंद्र भडाळे याने त्याचे ड्रिमकास्टर टूर्सचे ऑफिस पुणे येथे असल्याचे सांगत, लोणावळ्यातील 37 नागरिकांची केदारनाथ चारधाम यात्रा आपल्या कंपनीच्या माध्यमातून आयोजित केली होती. (Lonavala News) यासाठी प्रत्येकी 28 हजार रुपये असे 10,36,000 हजार चेकच्या माध्यमातून घेतले.
यात्रा कशी असेल, कोणती वाहने असतील याचा तपशील त्यांना दिला व ऐनवेळी यात्रा रद्द झाली असल्याचे सांगत जून महिन्यात यात्रा आयोजित करून देतो असे सांगितले. किंवा पैसे परत करतो असे सांगत 18 मे च्या तारखेचे चेक दिले. 18 मे रोजी चेक बँकेत भरले असता ते खात्यात पैसे नसल्याने वटले नाहीत. (Lonavala News) तेव्हापासून त्याचा फोन बंद आहे. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे ध्यानात आल्यानंतर वरील सर्वांनी लोणावळा पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonavala News : खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील २०० फुट खोल दरीत पडूनही वाचला तरुणाचा जीव…