Kadamwakwasti News लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथील अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर महादेव काळभोर यांची तर उपाध्यक्षपदी सोनाबाई अशोक शिंदे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Kadamwakwasti News)
अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२३ ते २०२८ ची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (ता. १५) पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ज्ञानेश्वर काळभोर व उपाध्यक्षपदी सोनाबाई शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे व्यवस्थापक मारुती सातव उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय. कल्याण (अण्णा) गुजर यांनी या पतसंस्थेची स्थापना सन १९९२ साली स्थापना केली आहे. तर हि पतसंस्था सुव्यवस्थित चालण्यासाठी त्यांना स्वर्गीय ॲड. पी.पी. काळभोर यांनी बहुमुल्य साथ दिली आहे.
पतसंस्था ही नागरिकांना अल्पदरात कर्ज पुरवीत आहे. संस्थेचे हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. पतसंस्थेमध्ये सध्या २ कोटी रुपयांच्या सभासदांच्या ठेवी आहेत. तर त्यातील पतसंस्थेने १ कोटी ७० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तर संस्थेकडे १६ लाखाचे भागभांडवल आहे. संस्थेने ५२ लाखाची गुंतवणूक केली असून संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल ७ कोटी ५० लाख रुपये आहे.
याबाबत पुणे प्राईम न्यूज शी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर काळभोर म्हणाले कि, आगामी काळात पतसंस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. तसेच संचालकमंडळ आणि सर्व सदस्यांना एकत्र घेऊन पतसंस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
संस्थेच्या नवनिर्वाचित सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे
सूर्यकांत दगडोबा खैरे, अशोक निवृती कदम, अनिल रामचंद्र टिळेकर, हरिभाऊ मारुती कदम, सोमनाथ कल्याणराव गुजर, प्रकाश अंकुश कांबळे, आशालता रमेश खैरे, स्वाती प्रकाश काळभोर
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : आगामी निवडणुकीत दौंडमध्ये तिरंगी सामना रंगणार? कोण आहे तिसरा उमेदवार?