Pune News:शिक्रापूर : आरणगाव (ता. शिरुर) येथील तोंडेवस्तीच्या परिसरात दोन कुऱ्हाडधारी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून तीन घरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केली आहे. (Shikrapur Crime) चोरट्यांनी एका महिलेवर कुऱ्हाडीने वार करून तिच्या अंगातील दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. (Shikrapur Crime)
शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी त्यांचा मुलगा बाबाजी गणपत तांबे (वय ३५ रा. आरणगाव ता. शिरुर जि. पुणे) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरणगाव (ता. शिरूर) येथील बायडाबाई तांबे या घरात झोपलेल्या असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हातात कुऱ्हाड घेऊन दोन चोरटे घरात घुसले. चोरट्यांनी घरात शोधाशोध सुरू केली असता बायडाबाई जाग्या झाल्या. तेव्हा चोरट्यांनी ओरडू नको नाहीतर मारून टाकीन अशी धमकी बायडाबाई यांना दिली. तर एकाने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने बायडाबाई यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. व त्यांच्या अंगावरील एक तोळा वजनाचे दागिने काढून घेतले(.Shikrapur Crime)
त्यांनतर बायडाबाई यांनी आरडाओरडा केल्याने त्यांचा मुलगा बाबाजी तांबे हा जागा झाला. तेव्हा चोरटे पळून गेले. तर आलेल्या चोरट्यांनी तांबे यांच्या शेजारी राहणारे धनंजय तोंडे व चंदर भांड यांच्या देखील घरात चोरी केल्याचे समोर आले आहे(.Shikrapur Crime) या घटनेत बायडाबाई तांबे या जखमी झाल्या असून त्यांचावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शंकर साळुंके,Shikrapur Crime अमोल दांडगे, संतोष मारकड हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शिक्रापूर पोलिसांनी याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे करीत आहेत(Shikrapur Crime)